कोणत्‍याही शाळेचा,केंद्राचा युडायस पाहा
उंबरे केंद्राचा व सडे केंद्राचा उपस्थिती भत्‍ता सादिल खात्‍यावर जमा केलेला आहे त्‍वरीत काढून संबंधीत लाभार्थी मुलीस द्यावा व पेड बील केंद्रात द्यावे.
शालेय पोषण आहार जबाबदारी मुख्‍याध्‍यापकांवरील कमी करणेबाबतचा जी आर

Saturday, 26 April 2014

मुंबईदक्षिण प्रवासाचा प्रारंभिक टप्पा
दर बुधवारी १६.४० वा. शिवाजी टर्मिनसपासून प्रस्थान
कधीही न दमणार्‍या कार्यक्षम शहरात आपले स्वागत आहे ! मुंबई म्हणजे चैतन्य, आनंद, गतिमानता आणि मौजमजा! या शहराचा पूर्वी बॉम्बे म्हणून नामनिर्देश होत असे.भारताचे हे एक अत्याधुनिक शहर, नेहमी बदलत्या परिस्थिती बरोबर वाटचाल करणारी व आधुनिकतेचा वेग साधणारी ही मुंबई आहे.
एकेकाळी मुंबई बेटांचा समूह होता. राजे चार्ल्स - २ यांनी पोर्तुगालची राजकुमारी कथेरिना डे ब्रागांजा यांच्याबरोबर लग्न केले. त्यावेळी त्यांना लग्नाची भेट म्हणून हा बेटांचा समूह भेट देण्यात आला.
अनेक वर्षानंतर मुंबईला वसाहतवादापासून स्वातंत्र्य प्राप्ती मिळाली. त्यानंतर मुंबई एक मोठी बाजारपेठ, उद्योगव्यवसायाचे केंद्र, अनेक जातिधर्मातील परस्पर सौहार्द आणि आधुनिक शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. मुंबई शहर हे आजच्या भारताच्या बदलणार्‍या चेहर्‍याचे प्रतीक आहे. तरीही भारतीय परंपरा व मूल्य हृदयात जपत नव्या जुन्याचा समन्वय साधणारी मुंबई आधुनिक नगरी आहे.
मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे व येथील कार्यालयीन भाषा मराठी आहे. परंतु इंग्लिश, हिंदी भाषाही मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. वेगवान जीवनामुळे तात्काळ भोजन मिळणार्‍या(फास्ट फूड, वडा पाव आदि) दुकानांना वाव मिळला आहे. जवळपास सर्व रस्त्यांवर जिभेचे चोचले पुरविणारे शेकडो पदार्थ मिळतात. मुंबईची पाव-भाजी, भेळपुरी व कबाब हे आवडते खाद्य पदार्थ आहेत. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय चविष्ट पदार्थ आधुनिक उपहारगृहातून उपलब्ध आहेत.
मुंबई शहर खरेदी शौकीनांसाठी पर्वणीच आहे. ही मोठी बाजारपेठ आहे. हे शहर अत्यंत वेगवान व व्यस्त आहे. हिंदी चित्रपट उद्योग अर्थात बॉलीवूड याच शहरात आहे, जे जगात सर्वात जास्त चित्रपटांची निर्मिती करते. नाट्यगृहे, सिनेमागृहे, समुद्रकिनारे, नाईट क्लब, पब, विविध क्रीडाकेंद्रे याद्वारे मुंबई शहर तरूणांना आकर्षित करते.