कोणत्‍याही शाळेचा,केंद्राचा युडायस पाहा
उंबरे केंद्राचा व सडे केंद्राचा उपस्थिती भत्‍ता सादिल खात्‍यावर जमा केलेला आहे त्‍वरीत काढून संबंधीत लाभार्थी मुलीस द्यावा व पेड बील केंद्रात द्यावे.
शालेय पोषण आहार जबाबदारी मुख्‍याध्‍यापकांवरील कमी करणेबाबतचा जी आर

प्रसिद्धी व जाहिरात विभाग


शिक्षणोत्सव कार्यक्रम उंबरे

शिक्षणोत्सव  कार्यक्रम उंबरे येथे २८  फेब्रुवारी २० १ ३  रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरे ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सजनवाडी ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करपरावाडी ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाठवस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १०  वाजता पार पडला . उंबरे गावाच्या सरपंचा सौ .रेखा सुनील ढोकणे  यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले .प्रमुख पाहुणे श्री .दिगंबर पा .शिरसाठ  (उपसभापती पं .समिती  राहुरी ), श्री .गोरक्षनाथ पा दुशिंग (पं .स .सदस्य ), श्री .सचिन भिंगारदे (पं .स .सदस्य ), श्री .सुनिलभाऊ आडसुरे (संचालक डॉ .बा. बा .तनपुरे  साखर कारखाना ),श्री .गिताराम ढोकणे (उपसरपंच )आदि मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमासाठी वरील चारही  शाळांचे शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष, उपाध्यक्ष ,सदस्य व ग्रामस्थ तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .श्री .वांढ़ेकर सर यांनी सूत्रसंचालन केले .कार्यक्रमास श्री .धनवे साहेब (ग .शि .अ. पं .समिती  राहुरी) यांनी भेट दिली .तसेच केंद्राचे केन्द्रप्रमुख जाधव साहेब यांनी भेट दिली .व योग्य त्या सूचना केल्या .कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम ,स्टॉलचे उदघाटन ,प्रदर्शन ,शै .साहित्य प्रदर्शन ,व अल्पोपहार इ .कार्यक्रम पार पड़ले .कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकार्य केले .