कोणत्‍याही शाळेचा,केंद्राचा युडायस पाहा
उंबरे केंद्राचा व सडे केंद्राचा उपस्थिती भत्‍ता सादिल खात्‍यावर जमा केलेला आहे त्‍वरीत काढून संबंधीत लाभार्थी मुलीस द्यावा व पेड बील केंद्रात द्यावे.
शालेय पोषण आहार जबाबदारी मुख्‍याध्‍यापकांवरील कमी करणेबाबतचा जी आर

Friday 28 February 2014

सोन्‍याची कुदळ

एका माणसाला दोन मुले होती जेव्‍हा तो म्‍हातारा झाला. तेव्‍हा त्‍याने आपल्‍या दोन्‍ही मुलांना बोलावले आणि म्‍हटले,' आता माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्‍यापूर्वी मी तुम्‍हाला काही सांगू इच्छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. त्‍यामुळे मी माझ्यासमोरच पैशाची विभागणी करू इच्छितो, माझ्याकडे एक करामती कुदळ आहे. तिला जितके चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुदळ आहे आणि दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्‍ही सांगा की कोण काय घेणार? मोठ्या मुलाने विचार केली की कुदळीला कोणी चोरले तर आपल्‍याकडे काहीच राहणार नाही. त्‍यामुळे धन-संपत्ती घ्‍यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्‍यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती आणि छोट्या मुलाने कुदळ घेतली. वडील हरिद्वारला निघून गेले. त्‍यांचे नियंत्रण सरकताच मोठ्या मुलाने पैसा पाण्‍यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही काळानंतरच तो गरीब झाला. इकडे लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू त्‍यातून मातीच निघाली. सोने नाही, तो हैराण झाला की वडिलांनी आपल्‍याला खोटे का सांगितले? मग त्‍याच्‍या आत्‍म्याने म्‍हटले,'' नाही, वडील खोटे बोलू शकत नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्‍य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.'' असा विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्‍याने शेतात पिकाची पेरणी केली आणि भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्‍त पीक त्‍याच्‍या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्‍तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला.


तात्‍पर्य :- संपन्नतेची खरी चावी परिश्रमात आहे. जो परिश्रम करीत असतो त्‍याच्‍या घरी समृद्धी, सुख अवश्‍य येते. 

Thursday 27 February 2014

आजची बोधकथा

कुठलाही निर्णय घाईत घेवू नका......

          एक २४ वर्षाचा तरुण मुलागा आणि त्याचे वडील ट्रेन ने जात असतात.त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं कपल बसलेल असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे
जात आहेत..” त्याचे बाबा फक्त हसतात.
           त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय.
          तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत...” तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो......
          ”तुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का नेत नाही..?”
वडील हसतात आणि म्हणतात..”
          आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत, माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”

 
कुठलाही निर्णय घाईत घेवू नका... सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते..

चोराची माणुसकी

एका महानगरात नौकरी गमावलेला एक तरुण सिटीबस मधून उतरतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते की त्याचे पाकीट चोराने लांबवले. तो तरुण बुचकळ्यात पडतो. कारण त्याची नौकरी गेलेली असते आणि खिशात फक्त १५० रुपये आणि त्याने त्याच्या आईला लिहून ठेवलेले एक पत्र असते. ज्यात त्याने लिहिलेले असते की 
     "माझी नौकरी मी गमावून बसलो आणि तुला आता काही दिवस पैसे पाठवू शकत नाही."  
तीन दिवसापासून ते पत्र त्याच्या खिशात असते. पोस्ट करू की नाही ह्या मनस्थितीतच त्याचे १५० रुपये आणि ते पत्र चोरी होते.
१५० रुपये काही फार मोठी रक्कम नाही, पण त्या तरुणासाठी ते १५०० रुपयापेक्षा कमी नव्हते.
काही दिवसांनी त्याच्या आईचे पत्र त्याला मिळाले. तो तरुण आपल्या आईचे पत्र वाचून आश्चर्यचकित होतो. त्याची आई ने पत्रात लिहिले असते -
     "बाळ, तु पाठवलेले ५०० रुपयांचे मनीऑर्डर मला मिळाले. काळजी घे स्वतःची."
तो तरुण जाम बुचकळ्यात पडतो. त्याला प्रश्न पडतो, कोणी ५०० ची मनीऑर्डर केली असेल.
काही दिवसांनी परत त्याला एक पत्र येते, तोडक्या मोडक्या अक्षरात लिहिलेले, वाचण्यास आवघड पण ३ ते ४ ओळीचे -  
“प्रिय भाई, 150 रुपए तुम्हारे.. और 350 रुपए अपनी ओर से मिलाकर मैंने तुम्हारी माँ को.. मनीआर्डर.. भेज दिया है..। फिकर.. न करना। माँ तो सबकी.. एक- जैसी ही होती है न..! वह क्यों भूखी रहे...? 
तुम्हारा— जेबकतरा भाई..!!!