कोणत्‍याही शाळेचा,केंद्राचा युडायस पाहा
उंबरे केंद्राचा व सडे केंद्राचा उपस्थिती भत्‍ता सादिल खात्‍यावर जमा केलेला आहे त्‍वरीत काढून संबंधीत लाभार्थी मुलीस द्यावा व पेड बील केंद्रात द्यावे.
शालेय पोषण आहार जबाबदारी मुख्‍याध्‍यापकांवरील कमी करणेबाबतचा जी आर

Friday, 25 April 2014

कंजूस माणूस : अकबर बिरबल मराठी चातुर्य कथा

एकदा एक कवी श्रीमंत माणसाकडे गेला .त्याने आपल्या सर्व कविता गावून दाखविल्या कवीला वाटले आपलेला काही तरी बक्षिस मिळणार परंतु तो
श्रीमंत माणूस अतिशय चिकू होता .तो कवीला खुश करण्यासाठी म्हणाला तुमच्या कविता एकूण मी फारच खुश झालो आहे .उद्या तुम्ही परत माझ्या घरी
या म्हणजे मी हि तुम्हाला खुश करून टाकेन बक्षीस मिळाले नाही म्हणून कवीला वाईट वाटले परंतु परंतु उद्या बक्षीस भेटेल या आशेवर कवी घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी न चुकता तो त्या श्रीमंत माणसाच्या घरी हजर झाला .परंतु बराच वेळ झाला तरी श्रीमंत त्याला बक्षीस देण्याच नाव काढीना अखेर कवी घरी जाण्यासाठी उठला तेव्हा श्रीमंत म्हणाला कविराज आपण मला काल कविता ऐकवून खुश केलत तस तुम्ही उद्या माझ्या घरी या मी तुम्हाला खुश करून टाकेन अस म्हणून खुश केल प्रत्यक्षात तुम्ही मला काही दिल नाही .मी हि तुम्हाला काही दिल नाही आपला व्यवहार संपला या आता परत केव्हातरी बिचारा निराश होऊन निघून गेला एकदा संधी साधून घडलेली हगिगत बिरबलाला सांगितली बिरबलाने त्या श्रीमंत माणसाशी ओळख करून घेतली मैत्री वाढवली आणि एक दिवस त्याला आपल्या घरी जेवायला बोलवले कवीलाही त्याने आमंत्रण दिले सर्व मंडळी बिरबलाच्या घरी जमा झाली .तो कंजूष घरी येण्यापूर्वी सर्वांनी जेवून घेतले आणि ते गप्पा मारू लागले थोड्या वेळाने तो श्रीमंत हि घरी आला व त्या गप्पात सामील झाला
परंतु बराच वेळ झाला तरी बिरबल जेवनाच नाव घेईना न राहवून श्रीमंत म्हणाला जेवायचं नाही .का ?त्यावर बिरबल म्हणाला आपलेला फक्त खुश करण्यासाठी म्हणालो उद्या माझ्या घरी जेवायला या कंजूष श्रीमंत जे समजायचे ते समजला आणि काही न बोलता निघून गेला.