कोणत्‍याही शाळेचा,केंद्राचा युडायस पाहा
उंबरे केंद्राचा व सडे केंद्राचा उपस्थिती भत्‍ता सादिल खात्‍यावर जमा केलेला आहे त्‍वरीत काढून संबंधीत लाभार्थी मुलीस द्यावा व पेड बील केंद्रात द्यावे.
शालेय पोषण आहार जबाबदारी मुख्‍याध्‍यापकांवरील कमी करणेबाबतचा जी आर

Wednesday, 19 March 2014

मनः शांती - संत एकनाथांची एक बोध कथाएकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल .
एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले.
काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस."
तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला.
जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली.
ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो."
एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?"
तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले."
एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले,
"हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो."!! विहिरीचे लग्न !!
एकदा बादशहा आणि बिरबल मध्ये खूप कडाक्याचे भांडण झाले रागाच्या भरात बादशहा बिरबलाला म्हणाला तू राजधानी सोडून चालता हो
तुझी मला मुळीच गरज नाही .बिरबल अतिशय स्वाभिमानी होता .तो ताबडतोब राजधानी सोडून निघून गेला .आणि एका गावात वेश बदलून राहू लागला
बरेच दिवस उलटून गेले तरी बिरबल राजधानी मध्ये परतला नाही .बादशाहाला मात्र सारखी त्याची उणीव भासे त्याची कामे अडून राहू लागली
आणि त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बादशाहाला त्याच्या शिवाय करमत नव्हते .अन्न गोड लागत नव्हते .त्याने अनेक प्रकारे बिरबलाचा शोध घेतला
परंतु बिरबल सापडत नव्हता बिरबलाला कसे शोधून काढावे यावर बादशाहने खूप विचार केला .बादशाहने हि बिरबलाच्या सहवासात बरेच दिवस घालवले
होते .त्यामुळे बादशाहालाही त्याला शोधून काढण्याची युक्ती सुचली त्याने प्रत्येक गावात दवंडी पिटली .राजवाड्यातील विहिरीचे लग्न करावयाचे आहे.
लग्न समारंभ थाटात होणार आहे .तरी प्रत्येक गावाच्या लोकांनी आपआपल्या विहिरी सह उपस्थित रहावे .जे उपस्थित राहणार नाही त्यांना जबरदस्त दंड
केला जाईल सर्व लोक चिंतेत पडले कुणालाच काही सुचेना .बिरबल ज्या गावात राहत होता त्या गावातले लोक हि चिंतेत पडले होते गावाच्या पुढारी ना या
समस्येला कसे तोंड ध्यावे समजत नव्हते ठिकठिकाणी चर्चा सुरु झाल्या लोकांची मते घेतली जाऊ लागली .अशाच एका सभेला शेतकऱ्याचा वेश घेतलेला बिरबल हजर होता त्याने गावकरी ना जाण्याची युक्ती सांगितली .गावकरी खुश झाले .एक दिवस गावातील पाच सहा प्रमुख पुढारी उंची वस्त्रे घालून
दिल्ली ला गेले दरबारात बादशहा पुढे हात जोडून ते म्हणाले खाविंद आपल्या आध्ने प्रमाणे आणि निमंत्रण स्वीकारून आपल्या राजवाड्यातील विहिरीच्या लग्नाला आमच्या गावाच्या झाडून सर्व विहिरींना घेवून आम्ही हजर झालो आहोत .आमच्या गावच्या विहिरी वेशी बाहेर थांबल्या आहेत .तेव्हा आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे राजधानीतील काही प्रमुख विहिरींना त्यांचे स्वागत करण्यासाठी वेशी पर्यंत पाठवावे .त्याचे बोलणे ऐकून बादशहा जोरात हसला आणि
ओरडला बिरबल सापडला !बादशहा म्हणाला अजून पर्यंत एकही गावाचे लोक राजधानीत आले नाही तुम्हीच प्रथम हजर झाला .तुम्हाला हि युक्ती कोणी सांगितली ? एका शेतकऱ्याने महाराज गावकऱ्यांनी नम्र पने उत्तर दिले .तो शेतकरीच माझा बिरबल आहे. बादशाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले .
ताबडतोब त्याने माणसाबरोबर लवाजम्यासहित काझीला पाठून बिरबला राजधानीत सम्माने आण्याचा हुकुम दिला .बिरबल बादशाच्या महालात आला .
आणि त्याने बिरबलाल मिठी मारली .