कोणत्‍याही शाळेचा,केंद्राचा युडायस पाहा
उंबरे केंद्राचा व सडे केंद्राचा उपस्थिती भत्‍ता सादिल खात्‍यावर जमा केलेला आहे त्‍वरीत काढून संबंधीत लाभार्थी मुलीस द्यावा व पेड बील केंद्रात द्यावे.
शालेय पोषण आहार जबाबदारी मुख्‍याध्‍यापकांवरील कमी करणेबाबतचा जी आर

Saturday 15 March 2014

राजा आणि मुंगळा


एका जंगलात एक मुंगळा आपल्‍या बिळात राहत होता. एकदा त्‍या देशाचा राजा त्‍या जंगलात शिकार करण्‍यासाठी आला. सा-या मुंग्‍यांचे घर राजाच्‍या सैनिकांच्‍या घोड्यांच्‍या चालण्‍याने उद्ध्‍वस्‍त झाले. त्‍यामुळे मुंग्‍यांची राहण्‍याची समस्‍या निर्माण झाली. त्‍यांची अंडीही नष्‍ट झाली. मुंग्‍यांची लहान पिलेही मेली. आपली जात आणि वंश नष्‍ट झालेला पाहून मुंग्‍यांच्‍या सरदाराला फारच राग आला. त्‍याने राजाचा बदला घेण्‍याचे ठरविले. तो जंगलातून राजाच्‍या महालाकडे निघाले. रस्‍त्‍यात त्‍याला एक अस्‍वल गाठ पडले. त्‍याने मुंगळयाला विचारले,'' कुठे निघाला सरदार
?'' मुंगळयाने सर्व हकीकत अस्‍वलाला सांगितली. अस्‍वलाला पण राजाचा राग आला. तो पण मुंगळयाबरोबर निघाला. पुढे जाताना घोडा, हत्ती, उंट, माकड, वाघ, कोल्‍हा, लांडगा, तरस आणि अनेक प्राणी गाठ पडले. त्‍या सर्वांना हा राजाकडून झालेला अत्‍याचार कळाला व ते सर्वच जण मुंगळयाच्‍या सरदारासोबत राजाकडे निघाले. महालाच्‍या दारावर पोहोचल्‍यावर मुंगळ्याने राजाला युद्धासाठी पुकारले. आवाज ऐकून राजाने महालाच्‍या खिडकीतून खाली पाहिले तर तो इतकी मोठी प्राण्‍यांची फौज पाहून राजा घाबरला. त्‍याने कारण जाणून घेतले व आपली चूक मान्‍य केली. मुंगळ्याबरोबर त्‍याने तह केला त्‍यात मुंगळ्याच्‍या राहण्‍याच्‍या भागात त्‍याने मनुष्‍यास फिरण्‍यास बंदी केली व मुंगळ्याने राजाला झुकण्‍यास परावृत्त केले.


तात्‍पर्य :- संघटनेत मोठी ताकद असते. एकत्र राहिल्‍यास मोठ्यातल्‍या मोठ्या संकटाचा सामना करता येतो.