मग काय म्हणताय माझ्या बालमित्रांनो संपली का परिक्षा? सुट्टी लागली असेल आणि सुट्टीत काय काय करायचे कुठे कुठे जायचे याचे वेळापत्रकही तयार झाले असेल. कुणी सुट्टीला मामाकडे जाणार असेल तर कुणी आई बाबांबरोबर सहलीला, कुणी वेगवेगळया शिबीरात भाग घेणार असेल तर कुणी पोहण्याचा क्लास लावला असेल. दिवसभर नुसती धमाल करत असाल नाही? आणि खरं सांगू का अशी धमाल तर करायलाच हवी सुट्टी. कारण वर्षभर तुम्ही शाळा, शिकवणी, अभ्यास आणि परिक्षा या सर्वांमध्ये इतके गुंतलेले असता की धमाल करु म्हटले तरी वेळ नसतो.
बालमित्रांनो आजपर्यंत तुम्ही आजी आजोबांकडून किंवा पुस्तकांतून बर्याच गोष्टी ऐकल्या व वाचल्या असतील आणि त्यातून काही शिकलाही असाल. तुम्ही तुमच्या अवतीभवती किंवा बागेत अनेक प्राणी, पक्षी आणि अजूनही खुप काही गोष्टी पाहता, पण त्या गोष्टीमधील महत्वाची वैशिष्टे घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केलाय का? तुम्ही आता या सुट्टीत मागच्या सुट्टीपेक्षा एक वर्षाने मोठे झालात आणि हेच पुढच्या सुट्टीत पण होणार मग मोठे झालात तरीपण छोटेपणातले धडे विसरायचे नाही हं!

तुम्ही हत्तीदादाला पाहता. त्याचे ते भले मोठे शरीर, सुपाएवढे कान आणि लांब अशी सोंड हे सर्व
पाहता पण कधी त्याच्या इवल्याश्या डोळयातील तीक्ष्ण नजरेचा विचार केलाय का? तेव्हा मित्रांनो आपल्याला ह्या छोटयाश्या पण तीक्ष्ण अशा हत्तीदादाच्या दृष्टीचा आदर्श घ्यायचाय.


अतिशय चपळ असा प्राणी म्हणजे घोडा. तुम्हाला काय वाटते याच्याकडे
पाह्यल्यावर? याच्याकडून आपल्याला शिकता येणारी गोष्ट म्हणजे मोठी धाव घेण्यासाठी लागणारी बळकट टाप. मग घेणार ना ह्या बळकट टापेचा आदर्श धावायला?


मुंगी ही अतिशय छोटा प्राणी. साखरेचा एक दाणा मिळवण्यासाठी ती
किती धडपड करते, किती अथक परिश्रम करते. मग साखर म्हणजे हवे ते मिळवायचे असेल तर मुंगीचा आदर्श घ्यायला काय बिघडते?


कोकिळेला पाह्यल्यावर रंगाने काळा असलेला हा पक्षी त्याच्या कंठातून किती मधूर स्वर येतात.
तसेच मधूर स्वर जर आपल्या कंठातून बाहेर पडले तर किती छान होईल.

तेव्हा बालमित्रांनो ह्या सर्व गोष्टी पण तुम्ही ध्यानात घ्या आणि सुट्टीत जे जे काही पाहाल अनुभवाल त्यातून चांगल्या गोष्टी घेऊन पुढे चला आणि त्या नेहमी तुमच्या